PHOTO | ऑलिम्पिकसाठी महिला हॉकी संघाचा खास प्लॅन, पुरुष हॉकी संघासोबत ट्रेनिंग
दिली. आम्ही वेळेचा सदूपयोग केला आहे. आमचं लक्ष्य ऑलिम्पिककडे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक श्योर्ड मारिन्ये यांनी दिली (women hockey team)
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक श्योर्ड मारिन्ये यांनी शनिवारी (12 डिसेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसविषयी माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंची फिटनेस चांगली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
Follow us on
भारतीय महिला हॉकी टीमने फेब्रुवारी पासून कोणताही सामना खेळलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्याहून आल्यानंतर हा संघ बंगळुरुच्या खेळ प्राधिकारण केंद्रात सराव करत आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक श्योर्ड मारिन्ये यांनी शनिवारी (12 डिसेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसविषयी माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंची फिटनेस चांगली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
“खेळाडूंच फिटनेस सुधारावं हे आमचं प्राथमिक लक्ष्य होतं. ते आम्ही पूर्ण केलं आहे. आम्ही जुनियर पुरुष संघासोबतही सराव केला. मी संघाची प्रगती बघून खूश आहे”, अशी प्रतिक्रिया मारिन्ये यांनी दिली.
“फेब्रुवारीपासून हॉकीची एकही स्पर्धा झाली नाही. या आठ महिन्याच्या काळात संघाने कशाप्रकारे सराव केला याबाबत त्यांनी माहिती दिली. आम्ही वेळेचा सदूपयोग केला आहे. आमचं लक्ष्य ऑलिम्पिककडे आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला काही चांगले सामने खेळता येतील ज्यामुळे ऑलिम्पिकसाठी सराव होईल, अशी आशा आहे. सुरुवातीच्या सरावांनंतर आम्ही ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करु”, असं श्योर्ड मारिन्ये म्हणाले.
“गेल्या साडेचार महिन्यात खेळाडूंनी न थकता, कोणतीही तक्रार न करता प्रचंड मेहनत केली. मी खेळाडूंच्या वागणुकीने खूश आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांच्या ब्रेकमुळे त्यांनादेखील मानसिक थकवा दूर करण्यास मदत झाली”, असं श्योर्ड मारिन्ये यांनी सांगितलं.