नेब्युलायझर: जर लहान मुलांना थंडींमुळे खोकला येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला नेब्युलायझरने श्वास घ्यायला द्या. बालरोगतज्ज्ञांच्या मते, जी औषध श्वासाद्वारे घेतले जातात त्यामुळे भरुन आलेली छाती साफ होते.
वाफ द्या : सर्दी आणि कफ यापासून सुटका करायची असेल तर वाफ देणे हा चांगला पर्याय आहे. याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत. जर तुमचे बाळ असेल आणि त्याला वाफ देऊ शकत नसाल, तर बाळाला लहान खोलीत घेऊन जा स्टीमर चालू करा, त्याचा फायदाही चांगला होतो.
बाळाला जास्त झोपू द्या: आपले बाळ जर आजारी असेल तर त्याला सारखं खायला देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे झोपलेलं बाळ पुन्हा पुन्हा उठत असते. मात्र असे करु नका त्याला जास्त वेळ झोपू द्या त्यामुळे त्याच्या शरीराला थोडी विश्रांती मिळेल. आणि बाळाला लवकर बरे वाटेल.
गरम पाणी: बाळाच्या छातीत जमा झालेला कफ गरम पाण्यामुळे साफ होऊ शकतो. त्यामुळे बाळाला कोमट पाणी द्या, हे पाणी देताना ते जास्त गरम करु नका. गरम पाणी दिले तर त्याला इजाही पोहचू शकते.
सूप: जर तुमचे बाळ एक वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याच्या सर्दीवर उपाय म्हणून त्याला सूप द्या. सूपमुळे शरीराला ऊर्जा मिळू शकते. आणि मासांहार जर खात असाल तर त्याला चिकन सूप नक्की द्या. त्याच्या शरीरासाठी ते चांगलेच असते.