ही गोष्ट आहे वाडीकुरोली पंढरपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या उत्तम जालिंदर कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूरचे रहिवाशी असणाऱ्या नागेश अण्णासाहेब कुंभार यांचा चिरंजीव अभिषेक यांची...
Ad
कुटुंबीयांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या वधू वरांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ही पंढरपूरची लेक आपल्या विवाह सोहळयाला चक्क सात समुद्र ओलांडून एकटीच रवाना झाली. सध्या स्मिता आणि अभिषेक यांचा हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
Follow us on
लग्न म्हटलं की आले वराती-वर्हाडी आणि पै-पाहुण्याची गर्दी…मात्र सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 25 ते 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे उरकावे लागतायत.
ही गोष्ट आहे वाडीकुरोली पंढरपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या उत्तम जालिंदर कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूरचे रहिवाशी असणाऱ्या नागेश अण्णासाहेब कुंभार यांचा चिरंजीव अभिषेक यांची…
सध्या अभिषेक हा अमेरिकेत स्थायिक आहे. कोरोना काळातच ऑनलाईन पद्धतीने वधूआणि वराने एकमेकांना पसंत केलं आणि यांचा विवाह निश्चित झाला.
कोरोनाचं संकट कमी होईल आणि कुटुंबासमवेत आपल्याला हा सोहळा करता येईल, म्हणून 9 महिने लग्न ठरवून, बस्ता बांधून वधू-वर आणि कुटुंबीय एकमेकांकडे जाण्याची वाट पाहत होते.
मात्र कोरोनाचं संकट अधिकच वाढलं आणि एकट्या वधूलाच अमेरिकेला जाण्याचा व्हिसा मिळाला. मग, ऑनलाईन पद्धतीने कुटुंबाच्या उपस्थितीत 17 एप्रिल रोजी अमेरिकेतील मिशिगन शहरातील एका हिंदू मंदिरात हा लग्न सोहळा पार पडला.