सोशल मीडिया स्टार जन्नत जुबैर नुकताच उमराहसाठी मक्का पोहोचली होती, पण उमराह केल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. काहींना अभिनेत्रीचा बोल्डअंदाज आवडला आहे, तर काही चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
जन्नत जुबैर कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करत असते. पण आता फोटो पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. जन्नत हिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीवर अनेकांनी टीका केली आहे.
याआधी देखील जन्नत हिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता फोटो पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
जन्नत जुबैर सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर जन्नतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.