मेष - ज्योतिषांच्या मते मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अशुभ राहणार आहे. या ग्रहणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे या राशीचे लोक कुठल्याना कुठल्या तरी आजाराच्या कचाट्यात पडू शकतात. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अशुभ राहील आहे. या काळात कोणाशीही वाद टाळा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना काळजी घ्या. या काळात मुलांची विशेष काळजी घ्या.
तूळ - ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकते. या काळात व्यक्तीनी राग टाळाला पाहीले. या काळात एखाद्याशी गैरवर्तन करणे हानिकारक ठरू शकतो. या काळात या राशींच्या व्यक्तींच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - सूर्यग्रहणाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांवरही दिसून येईल. या काळात तणाव असू शकतो. तुम्हाला अस्वस्थता वाटेल या राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रात संयम राखला पाहीजे.
धनु - या सूर्यग्रहणाच्या काळात तुमची अनावश्यक धावपळ होईल. या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.