अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या घराची चर्चा रंगत आहे.
मायानरगीत सोनाक्षीचे एक दोन नाही तर तीन फ्लॅट आहेत. आता अभिनेत्री लवकरच तिच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. सध्या सोनाक्षीच्या नव्या घराचं काम सुरु आहे..
नव्या आलिशान घराचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने खिडकीतून दिसणारा नयनरम्य फेसिंग व्ह्यू चाहत्यांना दाखवला आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या नव्या घराची आणि फोटोंची चर्चा रंगत आहे.
नव्या घाराचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'झाडे आणि भांडी, दिवे आणि गाद्या, प्लेट्स आणि गाद्या, खुर्च्या आणि टेबल, काटे आणि चमचे, सिंक आणि डबे, हे सर्व पाहून माझं डोकं गरगरत आहे... घर बांधणं सोपं नाही...' असं लिहिलं आहे..
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच्या घडामोडींचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते..