घटस्फोटानंतर समंथा मन: शांतीच्या शोधात, सोशल मीडियावर शेअर केले चारधाम यात्रेचे फोटो
घटस्फोटानंतर अगदी 22 दिवसातच साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन समंथा चारधाम यात्रेला गेली आहे. या यात्रेमध्ये तिच्या सोबत तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे.
1 / 7
घटस्फोटानंतर अगदी 22 दिवसातच साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन समंथा चारधाम यात्रेला गेली आहे. या यात्रेमध्ये तिच्या सोबत तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे.
2 / 7
साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन समंथा रुथ प्रभू काही दिवसापूर्वी तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. नुकताच पती नागा चैतन्यपासून तिचा घटस्फोट झाला आहे. आता रिलेशनशिप तुटल्यानंतर २२ दिवसांनी ती मनाची शांतता शोधण्यासाठी चार धाम यात्रेला पोहोचली आहे, तिचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
3 / 7
तिने चारही पौराणिक स्थळांना भेटी दिल्या आणि बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनाने आपली यात्रा संपवली. यादरम्यान तिने या धार्मिक प्रवासाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अभिनेत्रीने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
4 / 7
चार धाम यात्रेचे फोटो समंथाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हेलिकॉप्टरजवळ उभे राहून पोज देत आहेत.
5 / 7
फोटो शेअर करण्याबरोबरच अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. ज्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं लिहिलं, 'एक अद्भुत प्रवास संपला आहे. चारधाम यात्रा, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ.
6 / 7
समांथाने तिच्या अनुभवाविषयी पुढे लिहिले आहे की, "एका सुंदर सहलीचा शेवट" असे म्हणतं तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या कॅप्शन मध्ये तिने महाभारतामध्ये हिमालयाचे वर्णन वाचून इथं येण्याचं स्वप्न मी डोळ्यात साठवलं होतं.
7 / 7
'हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. येथे सर्व काही जसे मी कल्पना केल्याप्रमाणे होते. अतिशय शांत आणि दिव्य. सत्य आणि मिथक यांच्यातील संयोग. माझ्या हृदयात हिमालयासाठी एक वेगळ स्थान आहे. आणि ते अद्भुत आहे आणि मग तुम्ही या अनुभवात माझ्याबरोबर आहात.