आजपासून नवरात्रोत्सव सुरु झालाय. भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातायत. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकन खेळाडूने नवरात्रीच्या पहिल्यादिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या 3 T20 आणि 3 वनडे सामन्यांच्या सीरीजसाठी भारत दौऱ्यावर आली आहे. 28 सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथे या मालिकेला सुरुवात होईल.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू केशव महाराजने तिरुवनंतपुरमच्या पद्मानंद स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
त्याने परंपेरनुसार धोती नेसली होती. त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केलाय. त्याचबरोबर केशव महाराजने नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.
केशव महाराजने फोटो शेयर करताना जय माता दी म्हटलं. 32 वर्षाच्या केशव महाराजचा उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरशी संबंध आहे. त्याचे पूर्वज 1874 साली डरबनला स्थायिक झाले.