साऊथचा सुपरस्टार, सगळ्यांचा लाडका बाहुबली प्रभास आज 44 वा वाढदिवस साजरा करतोय. प्रभासचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याच्या बद्दलची कुठलीही माहिती असेल तर चाहते ती आवर्जून वाचतात. आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या घराचे फोटो दाखवणार आहोत. अभिनेत्याचं अलिशान घर बघून तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघाल.
बाहुबली हा सिनेमा कुणाला आवडला नव्हता? हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. बाहुबली पाहून झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघण्यासारख्या होत्या. भव्य दिव्य, आलिशान असा बाहुबली सिनेमा प्रभासचं घर सुद्धा अगदी असंच आहे भव्य, दिव्य आणि आलिशान!
प्रभासचं घर बाहेरून जितकं दिसायला आलिशान आहे आत सुद्धा ते तितकंच आलिशान आहे. एखाद्या राजवाड्याप्रमाणे त्याच्या घरात शाही फर्निचर आहे. प्रभासच्या घरात लिव्हिंग एरिया आहे तिथे शाही फर्निचर आहे. त्याच्या घराची खिडकी सुद्धा खूप छान सजवलेली आहे. त्याचं घर एखाद्या राजवाड्याप्रमाणे वाटतं.
साऊथ सुपरस्टार, बाहुबली प्रभासचं हे आलिशान सुंदर घर हैदराबादच्या ज्युबिली हिल्समध्ये आहे. ज्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
प्रभास हैद्राबादमध्ये एका आलिशान राजवाड्यासारख्या बंगल्यात राहतो. प्रभासच्या बंगल्याचे फोटो इंटरनेटवर वेळोवेळी व्हायरल होत असतात. मोठ्या गार्डन पासून ते जिमपर्यंत सर्व काही त्याच्या या घरात आहे. एका मोठ्या भिंतीवर खूप फोटोज देखील आहेत. सगळ्यांनाच आवडेल असं हे घर आहे.