Pandharpur : पंढरपुरात नवरात्रीचा उत्साह, रुक्मिणीमातेला हिऱ्याच्या दागिन्यांनी सजवलं, तर विठुरायाचीही आकर्षक सजावट
यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी, टोप अशा सर्व दागिन्यानी देवीचे रूप मनमोहक दिसत होते. (Special decorations for Navratri at Vitthal Rukmini Temple, see photos)
1 / 5
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त आज आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या रूपात रुक्मिणी मातेची पूजा बांधण्यात आली यावेळी रुक्मिणीमातेला 30 प्रकारच्या आकर्षक दागिन्यानी सजवले होते.
2 / 5
यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी, टोप अशा सर्व दागिन्यानी देवीचे रूप मनमोहक दिसत होते.
3 / 5
तर श्री विठ्ठलाला, हिऱ्याचा हार, तुळशी हार, बाजू बंध, शिरपेच, कंठी, पेटी हार असा साज घालण्यात आला होता त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
4 / 5
नवरात्रीच्या काळात देवाचे हे वेगळे आणि आकर्षक देखणे रूप पाहण्यासाठी पंढरपूर आणि परजिल्ह्यातून अनेक महिला भाविक आवर्जून गर्दी करतात
5 / 5
ही आकर्षक सजावट भाविकांना मोहित करत होती.