बॉलीवूड कलाकार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस आहे. 20 एप्रिल 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या बंगल्यावर मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न झाले होते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. तेथे ऐश्वर्या राय बॉबी देओलसोबत 'ओर प्यार हो गया' या चित्रपटाचे शूटिंग करत होती. अभिषेक एका चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी आला होता. मात्र त्यावेळी अभिषेक अभिनेता नव्हता तर तो प्रॉडक्शन बॉय होता.
अभिषेक बच्चनने 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटातून पदार्पण केले होते. आणि त्याच वर्षी त्याने ऐश्वर्या रायसोबत 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात दोघांनाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.
2006 हे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनसाठी खास वर्ष होते. या वर्षी दोघांना खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. या वर्षी दोघांनी गुरू, उमराव जान आणि धूम २ हे चित्रपटामध्ये एकत्र काम केले. धूम २ च्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
यानंतर न्यूयॉर्कमध्ये गुरू या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान अभिषेक बच्चनने हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्या रायला प्रपोज केले.अभिषेकने ऐश्वर्या रायला प्रपोज करताना घातलेली अंगठी हिऱ्याची नव्हती तर ती बनावट होती. ही अंगठी त्याने 'गुरु' या चित्रपटाच्या सेटवरून घेतली होती.