उन्हाळ्यात आपण घरी 'मँगो-मिंट लस्सी' तयार करू शकता. चला मँगो-मिंट लस्सी नेमकी कशी तयार करायची हे पाहूयात.
मँगो-मिंट लस्सी तयार करण्यासाठी आपल्याला 1 आंबा, 2 चमचे साखर, 1 चमचे ताजी पुदीना पाने बारीक चिरून, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 कप दही आणि पुदीनाची पाने आवश्यक आहेत.
हे तयार करण्यासाठी प्रथम आंबा सोलून त्याचे लहान तुकडे करा. यानंतर वर दिलेले सर्व साहित्य बारीक करून घ्या.
यानंतर त्यात आइस क्यूब घाला आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्या.
आता एका ग्लासमध्ये मँगो-मिंट लस्सी घाला आणि पुदीना पाने घालून सर्व्ह करा.