SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर नवा विक्रम, वनडे फॉर्मेटमध्ये शेवटच्या 10 षटकात ठोकल्या इतक्या धावा
SA vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या वनडे सामन्यात धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 416 धावा केल्या. शेवटच्या 10 षटकात सर्वाधिक धावा ठोकत विक्रम प्रस्थापित केला आहे.
1 / 6
दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर यांच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाज पुरते हतबल झाल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 416 धावा केल्या.
2 / 6
हेनरिक क्लासेन याने 83 चेंडूत 13 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 174 धावा केल्या. तर डेविड मिलर याने 45 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. शेवटच्या दहा षटकात तर या दोन खेळाडूंनी कहर केला.
3 / 6
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 षटकात 173 धावांची खेळी केली. वनडे इतिहासात सामन्याच्या शेवटच्या दहा षटकात यापूर्वी कधीच इतक्या धावा झाल्या नव्हत्या. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता.
4 / 6
इंग्लंडने नेदरलँडविरुद्ध 2022 मध्ये शेवटच्या 10 षटकात 164 धावा केल्या होत्या. मात्र हा विक्रम आता दक्षिण आफ्रिकेने मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 10 षटकात 173 धावा केल्या.
5 / 6
क्लासेन आणि मिलर यांनी 222 धांवाची भागीदारी केली. हेनरिकने 83 चेंडूत 174 धावा केल्या. तर डेविड मिलर याने 5 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. डेविड मिलल याने वनडे क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या.
6 / 6
दक्षिण आफ्रिकेने वनडे क्रिकेटमध्ये 400 हून अधिक धावा सातव्यांदा केल्या. तसेच भारताचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताने सहावेळा 400 हून अधिक धावा केल्या आहेत.