18 व्या मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, बांधकाम व्यावसायिक डॉ निरंजन हिरानंदानी, आयोजक अनिल सिंह, विवेक सिंह आदी.उपस्थित होते.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मुंबई मॅराथॉनसाठी 55 हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती.
दिव्यांग स्पर्धकही मोठ्या उत्साहात मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुंबई मॅरेथॉनला उपस्थित होते.