सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान आता शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे.
सानिया-शोएबच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यानंतर त्याच नाव पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरसोबत जोडलं गेलं होतं.
कारण आयशा उमर आणि शोएब मलिकचे हॉट शूटचे फोटो समोर आले होते. दोघांनी स्विमिंग पूलमध्ये हे फोटो शूट केलं होतं.
आयशा उमर ही सुद्धा पाकिस्तानी अभिनेत्री, गायिका आणि निर्माती आहे. दोघांनी एका मॅगझीनसाठी हे फोटो शूट केलं होतं.
दोन वर्षापूर्वीच दोघांच हे फोटो शूट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.