आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 10 षटक टाकत 53 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला.
रवींद्र जडेजा याने शमीम हुसैन याला पायचीत केलं आणि गोलंदाजीत भारतासाठी एका विक्रमाची नोंद केली. वनडे फॉर्मेटमध्ये भारतासाठी 200 गडी बाद करणारा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 200 गडी बाद करणारा सातवा गोलंदाज ठरला आहे. तसेच भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये 200 गडी बाद करणारा तिसरा फिरकीपटू ठरला आहे.
रवींद्र जडेजा याने 182 वनडे सामन्यात 200 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. भारतासाठी 200 हून अधिक गडी बाद करण्याचा विक्रम स्पिनर अनिल कुंबले आणि हरभजन सिंग यांच्या नावावर आहे.
फिरकीपटूंचा विचार करायचं तर वनडेत अनिल कुंबलेने 334, हरभजन सिंगने 265, रवींद्र जडेजाने 200, सचिन तेंडुलकरने 154, आर. अश्विनने 151 आणि कुलदीप यादवने 150 विकेट घेतले आहेत.
वनडेत 200 गडी बाद करणारे डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा पाचवा गोलंदाज आहे. या यादीत सनथ जयसूर्या, शाकिब अल हसन, डेनियल विटोरी, अब्दुर रज्जाक, रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.