जगभरातील एथलीट्स मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत, चांगला डायट आणि विश्रांती बरोबर चांगल्या सेक्शुअल लाइफचा आधार घेतात. पण काही असेही खेळाडू आहेत, जे आपल्या प्रोफेशनल करिअर दरम्यान सेक्सपासून लांब राहिले. अशा चार खेळाडूंबद्दल जाणून घ्या. ज्यांनी मोकळेपणाने जगासमोर आपलं वर्जिन असणं मान्य केलं.
अमेरिकेची स्टार खेळाडू लोलो जोंसने एका मुलाखतीत वयाच्या चाळीशीपर्यंत वर्जिन असल्याचा खुलासा केला होता. जोंसने लग्नापर्यंत शरीरसंबंध ठेवले नाहीत. वयाच्या 40 व्या वर्षी 2013 मध्ये तिने लग्न केलं. लोलो जोंसने नंतर मान्य केलं, इतका काळ वर्जिन राहणं तिची चूक होती. कारण यामुळे तिला कधी डेटिंग करता आलं नाही.
ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू काकाने सुद्धा तो वर्जिन असल्याच मान्य केलं होतं. एसी मिलानच्या या मिडफिल्डरने आपली बालपणीची मैत्रीण कॅरोलीन सेलिकोबरोबर वर्ष 2007 मध्ये लग्न केलं. लग्नापर्यंत आम्ही दोघे वर्जिन होतो, असं काकाने सांगितलं. लग्नानंतर 10 वर्षांनी काकाचा सेलिको बरोबर घटस्फोट झाला.
माजी NFL स्टार टिम टीबोने सुद्धा लग्नापर्यंत वर्जिन राहण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्या या खेळाडूने वयाच्या 32 व्या वर्षी लग्न केलं. टिमने दक्षिण आफ्रिकेची मॉडल आणि माजी मिस युनिव्हर्स डेमी लेह नील पीटर्ससोबत 2020 मध्ये लग्न केलं.
अमेरिकेची प्रोफेशनल सर्फर बॅथनी हॅमिल्टन लग्न होईपर्यंत वर्जिन होती. बॅथनी धार्मिक वृत्तीची महिला होती. तिने लग्नानंतरच शरीरसंबंध ठेवलं.