IPL 2023 मध्ये एंट्री करण्याआधी Steve Smith घाबरला, आता डायरेक्ट पीच बदलून मैदनाबाहेर मिळवली नोकरी
स्टीव्ह स्मिथला मागच्यावर्षी ऑक्शनमध्ये कुठल्याही टीमने विकत घेतलं नव्हतं. यावर्षी त्याने ऑक्शनमधून नाव मागे घेतलं. पण, तरीही आयपीएल 2023 मध्ये या ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूने एंट्री केलीय.
1 / 5
क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक स्टीव्ह स्मिथ यावेळी आयपीएल 2023 मध्ये एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने ऑक्शनमधून नाव मागे घेतलं होतं. पण, तरीही स्टीव्ह स्मिथचा आयपीएलमध्ये जलवा दिसेल.
2 / 5
स्टीव्ह स्मिथ आयपीएल 2023 मध्ये कॉमेंट्री करणार आहे. आयपीएलमध्ये 103 सामने खेळलेला हा प्लेयर आता आपल्या आवाजाची जादू दाखवेल. स्टीव्ह स्मिथ किती मॅचमध्ये कॉमेंट्री करणार ते स्पष्ट नाहीय. पण या खेळाडूने नव्या पीचवर डेब्यु करण्याचा निर्णय घेतलाय.
3 / 5
स्टीव्ह स्मिथ वर्ष 2021 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. मागच्यावर्षी या खेळाडूला कुठल्याही टीमने विकत घेतलं नाही. आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये त्याने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. कदाचित कोणी विकत घेणार नाही, ही भीती होती.
4 / 5
स्टीव्ह स्मिथने रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्सच नेतृत्व केलय. धोनीसारखा प्लेयर त्याच्या नेतृत्वाखाली खेळलाय. स्मिथने आपल्या आयपीएल करिअरमध्ये 34.51 च्या सरासरीने 2451 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 11 अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 128 चा आहे.
5 / 5
IPL 2023 मध्ये स्टीव्ह स्मिथ भले खेळणार नसेल, पण त्याच्या देशाचे अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल मार्श, टिम डेविड आपली क्षमता दाखवून देतील.