BAN vs PAK: तो आला, 1 रन केला अन् बनवलं रेकॉर्ड, पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमची कमाल
बाबर आझमने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धाव केली आणि यासह तो पाकिस्तानचा सर्वात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठऱला आहे.
1 / 4
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपली जादू दाखवू शकला नाही. कर्णधार असूनही तो फक्त एक धाव करुन तंबूत परतला. त्यांने 5 चेंडूत फक्त 1 धाव केली. पण, ही एक धाव त्याच्यासाठी चांगलीच महत्त्वपूर्ण ठरली. एका रनच्या बळावर त्याने आपल्यापेक्षा दहा वर्षे वरिष्ठ असलेल्या पाकिस्तानी खेळाडला मागे टाकले.
2 / 4
बाबर आझमने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धाव केली आणि यासह तो पाकिस्तानचा सर्वात जास्त धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानमधील फलंदाज ठऱला आहे.
3 / 4
बाबर आझमने 2016 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 2515 धावा आहेत. या धावसंख्येच्या जोरावर तो पाकिस्तानमधील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्यापेक्षा 10 वर्षे सिनियर असलेल्या पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफिजला मागे सोडले आहे.
4 / 4
2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2514 धावा केलेल्या आहेत. बाबरकडे सध्या हाफिजपेक्षा एक धाव जास्त आहे. बाबर आणि हाफिजनंतर शोएब मलिकने पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2423 धावा केलेल्या आहेत. एका धावाच्या जोरावर बाबर पाकिस्तान संघातील अव्वल खेळाडू ठरला आहे.