PHOTOS : मुलाखती दरम्यान मयंतीला पाहताच स्टुवर्टची विकेट पडली, अशी आहे स्टुवर्ट-मयंतीची ‘Love Story’
मागील बराच काळापासून भारतीय संघात नसलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने (Stuart Binny) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोमवारी (30 ऑगस्ट) ही माहिती दिली.
1 / 5
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने (Stuart Binny) सोमवारी (30 ऑगस्ट)
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून
निवृत्ती घेतली आहे. भारताकडून एकदिवसीय सामन्यात केवळ 4 धावा देत 6 विकेट पटकावणारा एकमेव
गोलंदाज असणारा बिन्नी आता पुन्हा भारतीय संघातून खेळताना दिसणार नाही. दरम्यान बिन्नीच्या या सुंदर
रेकॉर्डप्रमाणेच त्याची लव्ह स्टोरीही तितकीच सुंदर आहे. बिन्नीने स्पोर्ट्स अँकर मयंती लांगरशी 9 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. (सौजन्य - स्टुवर्ट बिन्नी इन्स्टाग्राम)
2 / 5
स्टुवर्ट आणि मयंती यांची पहिली भेट इंडियन क्रिकेट लीगच्या (ICL) एका सामन्यादरम्यान झाली होती.
मयंती स्टुवर्टची मुलाखत घेत असताना स्टुवर्ट तिच्या प्रेमात पडला. दोघांची लव्ह स्टोरी फारचं भारी असून दोघांनी पहिल्या भेटीनंतर
लगेचच लग्न केलं नसून काही काळ रिलेशनमध्ये होते. (सौजन्य - स्टुवर्ट बिन्नी इन्स्टाग्राम)
3 / 5
स्टुवर्टच्या क्रिकेट कारकिर्दीत एक काळ असा आला, जेव्हा तो कर्नाटक
संघात स्थान मिळवण्यासाठी फार मेहनत घेत होता. पण तेव्हाच
2007 मध्ये इंडियन क्रिकेट लीगमधून तो हैद्राबाद हीरोज संघातून खेळला. त्याला एका सीजनमध्ये
मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. त्याचवेळी मयंती आणि त्याची भेट झाली. (सौजन्य - स्टुवर्ट बिन्नी इन्स्टाग्राम)
4 / 5
मुलाखतीदरम्यान मयंतीच्या प्रेमात पडलेल्या स्टुवर्टला एका मुलाखतीदरम्यान दोघांच्या नात्याबाबत विचारले असता, तो
लाजला ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित पडलं. (सौजन्य - स्टुवर्ट बिन्नी इन्स्टाग्राम)
5 / 5
2007 मध्ये पहिल्यांदा भेटल्यानंतर 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून दोघेही सप्टेंबर, 2012 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यानंतर दोन वर्षातच
स्टुवर्टला भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालं. 2014 मध्ये स्टुवर्टने बांग्लादेशच्या
विरुद्ध केवळ 4 धावा देत 6 विकेट पटकावले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. दरम्यान अनेक मुलाखतीत स्टुवर्टने
त्याच्या कठीण काळात मयंती त्याला फार सपोर्ट करत असल्याचे त्याने सांगितले आहे. दोघेही अनेकदा आपल्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे
फोटो टाकत असतात. (सौजन्य - स्टुवर्ट बिन्नी इन्स्टाग्राम)