कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल (IPL 2021) स्थगित झाली. आता उर्वरीत आयपीएलचे सामने सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येणार असल्याने सध्या बरेच खेळाडूघरीच निवांत वेळ घालवताना सोशल मीडियावरही बरेच अॅक्टिव्ह दिसत आहेत. दरम्यान चेन्नई सुपरकिंगचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहरनेही (Deepka Chahar) आपला नवा लूकसोशल मीडियवर शेअर केला आहे. (CSK Bowler Deepak Chahar Posted New Short Hair Look Photos On Social Media)
दीपकने त्याचे केस एकदम कमी केले असून एक वेगळा कट मारला आहे. ब्लॅक टी-शर्टमधील हे फोटो दीपकने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
दीपक सध्या चेन्नई सुपरकिंगचा महत्त्वाचा खेळाडू असून 2018 मध्येच त्याने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केले.
दीपक खेळासह त्याच्या फिटनेसवरही कमालीचं लक्ष देतो. तो अनेकदा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
दीपकचा चुलत भाऊ राहुल चहर (Rahul Chahar) देखील क्रिकेटपटू असून मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू आहे.