16 वर्षांच्या फलंदाजाने घडवला इतिहास जो 131 वर्षांत कुणालाही घडवता आला नाही!
यॉर्कशायर आणि ससेक्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ससेक्सकडून खेळताना डॅनिअल इब्राहिमने कौंटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वांत कमी वयात म्हणजेच 16 वर्षांचा असताना अर्धशतक ठोकलंय. (Danial Ibrahim become Youngest Score Fifty in 131 year County Championship)
1 / 5
इंग्लंडच्या कौंटी चॅम्पियनशिपमध्ये 16 वर्षाच्या फलंदाजाने धडाकेबाज कामगिरी केली असून मागील 131 वर्षांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. 16 वर्षांचं वय असताना कौंटीमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच त्याने इतिहास रचून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आहे.
2 / 5
4 जून रोजी यॉर्कशायर आणि ससेक्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ससेक्सकडून खेळाताना डॅनिअल इब्राहिमने ही कामगिरी केली. कौंटी चॅम्पियनशिपमध्ये कमी वयात अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.
3 / 5
या स्पर्धेच्या 131 वर्षांच्या इतिहासात डॅनिएल इब्राहिमच्या वयाच्या कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक ठोकलेले नाही. डॅनियल इब्राहिम हा ससेक्सकडून पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज आहे.
4 / 5
डॅनिअलच्या फिफ्टीवेळी एक प्रसंग घडला. डॅनिअलने मारलेल्या शॉट डॉम बेसने अडवला खरा पण त्याने जोरात थ्रो मारला आणि डॅनिअलला अतिरिक्त धावा मिळाल्या. याचसोबत त्याने पदार्पणाच्या सामन्यात कौंटीमध्ये सर्वांत कमी वयात अर्धशतक ठोकून इतिहास घडवला.
5 / 5
डॅनियल अजूनही शिकतो आहे. त्याला हे देखील माहिती नव्हतं की तो ससेक्ससाठी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, मला ज्यावेळी ही बातमी कळाली, तेव्हा मला खूप आनंद झाला होता.