Team India : विराट कोहली आणि धोनीच्या कार्यकाळात या चार खेळाडूंचं करिअर संपलं, कसं ते जाणून घ्या

| Updated on: May 09, 2023 | 5:48 PM

Team India : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी खेळत असलेल्या चार क्रिकेटपटूंचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं. निवडकर्त्यांसोबतच कर्णधारांनीही या खेळाडूंकडे दुर्लक्ष केलं.

1 / 5
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे कर्णधार असताना चार क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपली. निवड समिती या चार खेळाडूंकडे दुर्लक्ष तर केलंच. कर्णधारांनी दुर्लक्ष केल्याने अचानक टीम इंडियात संधी मिळाली नाही. या चार खेळाडूंसोबत वाईट झाल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या कारकिर्दीत या खेळाडूंवर अन्याय झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

2 / 5
अंबाती रायडू : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी मार्गावर होता. अशा वेळी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती घेतली. 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या निवडीदरम्यान, निवडकर्त्यांनी कव्हर प्लेयर म्हणून अंबाती रायडूची निवड केली होती. पण शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले. अष्टपैलू विजय शंकर जखमी झाल्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळाली. अंबाती रायडूला दोन वेळा डावलण्यात आलं. मयंक अग्रवालला 2019 च्या विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी तो 15 सदस्यीय संघाचा भाग होता. विराट कोहलीने अंबाती रायडूकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच वैतागून हैदराबादच्या या खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून धक्का दिला.

3 / 5
अमित मिश्रा: एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात अमित मिश्रा याच्या नावाची बरीच चर्चा होती. या लेगस्पिनरने चांगली गोलंदाजी केली. पण, तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अमित मिश्राला हवी तशी संधी दिली नाही. अमित मिश्राने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी केली आहे. अमितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. अमित मिश्राने 22 कसोटीत 76 बळी घेतले. दरम्यान, अमित मिश्राने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अमित मिश्राने 36 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.73 च्या इकॉनॉमी रेटने 64 विकेट घेतल्या. अमित मिश्राने 10 टी-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या. पण त्याला पुरेशी संधी मिळाली नाही.

4 / 5
मनोज तिवारी: मनोज तिवारीने भारतीय क्रिकेट संघात छाप पाडली आहे. तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियामध्ये पदार्पण केले. मनोज तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मनोज तिवारीने विशेष काही केले नाही. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिवारीने 26.09 च्या सरासरीने केवळ 287 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 धावांची होती. त्याचप्रमाणे त्याने 2011 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला केवळ 3 सामन्यांमध्ये संधी आली.

5 / 5
वरुण आरोन: भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज वरुण आरोनची क्रिकेट कारकीर्दही संपुष्टात आली आहे. आरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 63 सामन्यात गोलंदाजी केली आणि 167 विकेट घेतल्या. ही कामगिरी पाहून निवड समितीने वरुणला भारतीय क्रिकेट संघात संधी दिली. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला पुरेशी संधी दिली नाही. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. वरुण आरोनने 9 कसोटीत 18 बळी घेतले. वरुण आरोनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वरुण आरोनने 9 एकदिवसीय सामन्यात 11 विकेट घेतल्या.