IND vs AUS Final : विराट कोहलीची संकटमोचक खेळी, अर्धशतकी खेळीसह रचला विक्रम
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची सुरुवात एकदम खराब झाली. तीन गडी झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर प्रेशर आलं. शुबमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर बाद झाले. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. विराटने अर्धशतकी खेळीसह विक्रम प्रस्थापित केला आहे.
1 / 6
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात विराट कोहलीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. तीन गडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला आणि अर्धशतकी खेळी केली.
2 / 6
विराट कोहलीने संघ अडचणीत असताना विराट कोहलीने केएल राहुल सोबत आश्वासक भागीदारी केली. विराट कोहलीने 56 चेंडूत 50 धावा केल्या. विराट कोहलीने या स्पर्धेत 3 शतकं, पाच अर्धशतकं झळकावली आहेत.
3 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विराट कोहली याची बॅट चांगलीच तळपली आहे. गोल्डन बॅटच्या शर्यतीत अव्वल स्थानी असून तिथपर्यंत पोहोचणं इतर फलंदाजांना खूपच कठीण आहे. त्यामुळे गोल्डन बॅट विराट कोहलीला मिळणार हे नक्की आहे.
4 / 6
विराट कोहली वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने रिकी पॉटिंगला मागे टाकत दुसरं स्थान गाठलं आहे.
5 / 6
वनडे वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 2278 धावा केल्या आहेत. विराट कोहली 1762 धावांसह दुसर्या स्थानावर आहे. पॉंटिंग 1743 धावांसह तिसऱ्या, रोहित शर्मा 1575 धावांसह चौथ्या आणि कुमार संगकारा 1532 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
6 / 6
श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. संगकाराने 320 धावा करत विक्रम केला आहे. आता 41 धावा करताच हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.