IND vs ENG : सरफराज खानच्या जर्सी नंबर 97 चं खास कनेक्शन, पदार्पणातच केला खास रेकॉर्ड, वाचा काय ते
मुंबईचा सर्फराज खान भारताचा 311 वा कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत त्याला पहिली कसोटी कॅप मिळाली. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतक ठोकलं. तसेच आपली छाप सोडली. या सामन्यात त्याने परिधान केलेली 97 नंबरच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामागे खास कारण आहे.
1 / 6
राजकोट कसोटीत पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने 48 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सरफराजने 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
2 / 6
सरफराज खानने पदार्पणातच कसोटीत एक विक्रम केला आहे. भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
3 / 6
सरफराजने शिखर धवन आणि पृथ्वी शॉला मागे टाकले आहे. पृथ्वीने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 56 चेंडूत अर्धशतक केले होते. तर शिखर धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. आता सरफराजने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच हार्दिक पांड्याशी बरोबरी केली असून त्यान 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 48 चेंडूत अर्धशतक केले होते.
4 / 6
सरफराज खानने जर्सी नंबर म्हणून 97 निवडला. कारण हा नंबर त्याचे वडील नौशाद खान यांच्या नावाशी जोडला गेला आहे. 9 म्हणजे हिंदीत नौ और 7 हिंदीत सात होतं पण असं शाद असं पकडलं (नौशाद). वडिलांनी सरफराजला क्रिकेटचे धडे दिले आहेत. नौशाद हे मुंबई क्रिकेटमधील प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत.
5 / 6
सरफराजला पदार्पणाची कसोटी कॅप मिळाल्यानंतर त्याचे वडील भावूक झाले. नौशाद खानने आपल्या मुलाला मिठी मारली आणि आपले अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी सरफराजची पत्नीही उपस्थित होती.
6 / 6
97 या नंबरमध्ये 9 आणि 7 हे अंक आहेत. हे अंक त्याच्या वडिलांच्या नावाशी जोडलेले आहे. सरफराजचा भाऊ मुशीर खान यानेही 2024 च्या अंडर19 वर्ल्डकपमध्ये 97 नंबरची जर्सी परिधान केली होती.