एक दोन तीन चार..! टीम इंडियाला मिळाले वॉशिंग्टन सुंदरचे ‘सात’, न्यूझीलंडला दिवसा तारे दाखवत रेकॉर्ड

| Updated on: Oct 24, 2024 | 5:24 PM

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करत आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली. वॉशिंग्टन सुंदरने 1329 दिवसानंतर कसोटीत कमबॅक केलं आणि शेवटच्या 7 विकेट काढल्या.

1 / 5
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना पुण्यात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने सावध खेळीला सुरुवात केली होती. 200 धावांच्या आसपास सर्वकाही ठीक चाललं होतं. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर नावाचं वादळ घोंगावलं. न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला.

2 / 5
न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 259 धावा केल्या. यात 7 विकेट एकट्या वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 23.1 षटकात 4 षटकं निर्धाव टाकत 59 धावा दिल्या आणि 7 विकेट घेतल्या. याप पाच विकेट हे क्लिन बोल्ड आहे. तर एक एलबीडब्ल्यू आणि एक कॅच आऊट आहे.

3 / 5
वॉशिंग्टन सुंदरने आपला शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध मार्च महिन्यात खेळला होता. 1329 दिवसानंतर गोलंदाजी आलेल्या वॉशिंग्टनने रचिन रवींद्रची विकेट काढली आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे.

4 / 5
वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्र 65, डेरिल मिचेल 18, टॉम ब्लंडेल 3, ग्लेन फिलिप्स 9, सँटनर 33, साउदी 5, एजाज पटेल 4 या खेळाडूंना बाद केलं. चौथी विकेट 197 वर पडली. त्यानंतर 62 धावांमध्ये उर्वरित 6 विकेट पडल्या.

5 / 5
भारतात खेळताना पहिल्या डावात सर्वच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेण्याची ही सहावी वेळ आहे. यात अश्विनने 3 आणि वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्ध 1952 साली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1956 साली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1964 साली, इंग्लंडविरुद्ध 1973 साली,इंग्लंडविरुद्ध 2024 साली आणि न्यूझीलंडविरुद्ध 2024 साली दहा विकेट घेतल्या आहेत.  (सर्व फोटो बीसीसीआय ट्वीटर)