दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय सपशेल फेल ठरला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. जर पहिल्या सामन्यात विजय झाला तर नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.
भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेला नाही. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात अपयश आलं आहे.
केपटाऊनमधील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर मालिकेत 1-1 ने बरोबरी होईल. दक्षिण अफ्रिकेत मालिका ड्रॉ करणारा महेंद्रसिंह धोनीनंतर दुसरा कर्णधार ठरेल. त्यमुळे आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत घसरण झाली आहे. मात्र दुसऱ्या कसोटीतील विजयामुळे यात सुधारणा होईल. तर पाचव्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर मजल मारली जाऊ शकते. तसेच दक्षिण अफ्रिकेला अव्वल स्थान गमवावं लागू शकते.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी