दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन याने 12 गडी बाद केले. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले.
12 गडी बाद करत आर. अश्विन याने काही विक्रमांची नोंद केली आहे. तसेच श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकलं आहे. मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात सहा वेळा 12 पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहे. अश्विनने ही कामगिरी अवघ्या 93 कसोटीत केली आहे.
वेस्ट इंडिजच्या धरतीवर कसोटीच्या दोन्ही डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा आर. अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
आर अश्विन याची कसोटी सामन्यात शेवटचा गडी टिपण्याची 23 वी वेळ आहे. जोमेल वॉरिकन याला पायचीत करत अश्विनने शेन वॉर्नचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अश्विनने दुसरं स्थान मिळवलं आहे. अनिल कुंबलेच्या नावावर 953 गडी आहेत. तर हरभजनच्या नावावर 707 गडी आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध 12 गडी बाद करत अश्विनच्या नावावर 709 विकेट्स झाले आहेत.
अश्विनने आठव्यांदा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 12 गडी बाद करत अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने शेवटच्या कसोटीतही 10 विकेट घेतल्यास हा पराक्रम करणारा भारताचा नंबर 1 गोलंदाज ठरेल.