IND vs SA T20 World Cup Final 2024 : फायनल आधी कॅप्टन रोहित शर्माला मिळाली वाईट बातमी
IND vs SA T20 World Cup Final 2024 : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनल सामन्याला आता फक्त काही तासांचा वेळ उरला आहे. बारबडोसच्या ब्रिजटाऊन मधील केंसिग्टन ओवल स्टेडियमवर फायनल सामना खेळला जाणार आहे.
1 / 10
दोन्ही टीम्सनी दमदार प्रदर्शन करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोघांनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन केलय. दोन्ही टीम एकही सामना हरलेल्या नाहीत.
2 / 10
फॉर्म पाहता टीम इंडियाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल जात आहे. फायनल आधी टीम इंडियाला जी बातमी मिळालीय, ती धोक्याची घंटा आहे. या बातमीमुळे टीम इंडियाच्या फॅन्सना पराभवाची भिती सतावत आहे.
3 / 10
दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर राहून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या टीमने दमदार प्रदर्शन केलय.
4 / 10
अफगाणिस्तानवर 9 विकेटने एकतर्फी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने सुद्धा सुपर-8 च्या आपल्या ग्रुपमध्ये पहिलं स्थान मिळवलय. सेमीफायनलमध्ये इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करुन 10 वर्षानंतर T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
5 / 10
आज शनिवारी 29 जुलैला फायनल सामना खेळला जाणार आहे. दोन्ही टीम्स अजूनपर्यंत एकही सामना हरलेल्या नाहीत. टीम इंडियाने जवळपास प्रत्येक सामन्यात एकतर्फी विजय मिळवलाय. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमला विजेतेपदाच प्रबळ दावेदार मानल जातय.
6 / 10
आता अंतिम सामन्यात जय-पराजयाचा निर्णय मैदानातच होईल. जी टीम चांगलं क्रिकेट खेळेल, ज्यांना नशिबाची साथ मिळेल, ते किताब जिंकणार. फायनलआधी टीम इंडियाला एक वाईट बातमी मिळालीय.
7 / 10
ही बातमी म्हणजे एकप्रकारच्या वाईट संकेतासारखी आहे. फायनल मॅचच्या अंपायर बाबत ही बातमी आहे. ज्याची घोषणा शुक्रवारी आयसीसीने केली.
8 / 10
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार फायनलमध्ये ऑन फील्ड अंपायरिंगची जबाबदारी क्रिस गॅफनी (न्यूजीलंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) यांच्या खांद्यावर असेल. टीवी अंपायर रिचर्ड कॅटलबरो (इंग्लंडचे) असतील.
9 / 10
हे तिन्ही अंपायर्स सक्षम आहेतच. त्याचवेळी कोणीही भारत किंवा दक्षिण आफ्रिकेशी संबंधित नाहीय.
10 / 10
फक्त इतकत आहे की, तीन अंपायर्सपैकी कॅटलबरो आणि इलिंगवर्थ यांना, जेव्हा कधी टीम इंडिया फायनलमध्ये असताना अंपायरिंगची जबाबदारी मिळालीय, तेव्हा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय.