Test Cricket : मायदेशात कसोटी क्रिकेटमधील अपयशी भारतीय कर्णधार, रोहित कितव्या स्थानी?

| Updated on: Nov 04, 2024 | 11:13 PM

Indian Test Cricket Captains : टीम इंडियाला मायदेशात न्यूझीलंडकडून 3-0 अशा पद्धतीने व्हाईटवॉश स्वीकारावा लागेल, असं विचार कोणत्याही चाहत्याने केला नव्हता. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला.

1 / 6
न्यूझीलंडने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करत इतिहास रचला. न्यूझीलंड भारताला मायदेशात व्हाईटवॉश करणारी पहिली टीम ठरली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 3-0 ने गमावली. त्यामुळे रोहितचा कर्णधार म्हणून नको त्या यादीत समावेश झाला आहे.

2 / 6
न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात रोहितसेनेचा धुव्वा उडवला. त्यासह कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.

3 / 6
रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा दुसरा कर्णधार ठरला आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 16 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 5 सामने गमावले आहेत.

4 / 6
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक सामने गमावले आहेत. पतौडींनी भारताचं मायदेशात 27 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 9 वेळा भारताचा पराभव झाला.

5 / 6
कपिल देव या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. देव यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले. तर 4 सामन्यात पराभूत व्हावं लागंल.

6 / 6
मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.