भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहाणी त्यांच्या खेळासारखीच इंटरेस्टींग आहे. अशीच भारी Love Story आहे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची. भारतीय संघातील एक हसतमुख चेहऱ्याचा खेळाडू म्हणून नेहराची ओळख. त्याच्या सोबतच्या अनेकांनी हे मान्य देखील केले आहे की सोशल मीडियापासून लांब असलेला नेहरा खऱ्या जीवनात मात्र बराच इंटरेस्टीगं आहे. अशीच इंटरेस्टींग नेहराची प्रेम कहाणी आहे जी क्रिकेटच्या मैदानावर सुरु झाली होती. (Indian formar bowler Ashish Nehra And Wife Rushma Nehra Untold Love Story)
नेहरा याच्या पत्नीचं नाव रुश्मा असं असून त्यांची पहिली भेट 2002 मध्ये नेहरा इंग्लंड दौऱ्यावर असताना झाली होती. रुश्मा द ओवलच्या मैदानावर सामना पाहायला आली होती. त्याचवेळी नजरानजर झाली आणि एका प्रेम कहाणीचा जन्म झाला.
ओवलमधील भेटीनंतर दोघांच्यात गप्पागोष्टी होण्यास सुरुवात झाली. दोघेही एकमेंकाना भेटू लागले. दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. रुश्मा ही गुजरातची राहणारी आहे.
नेहराने गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियनमध्ये आपल्या लग्नाबद्दल सांगितल. तेव्हा तो म्हणाला आम्ही दोघेही बराच काळापासून रिलेशनमध्ये होतो. तेव्हा अचानक घरात मित्रांसोबत बसलो असताना विषय निघाला आणि मी लग्न करायचं ठरवलं. त्यानंतर पुढच्या सात दिवसांत मी लग्न उरकून घेतलं.
रुश्मा आणि आशिष हे 2 एप्रिल, 2009 रोजी लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्याच दिवशी दोन वर्षानंतर भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला. नेहराची पत्नी रुश्मालाही क्रिकेटची आवड असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे.