10 ओव्हरमध्ये मॅच जिंकली, 9 विकेट्सने धुव्वा, विराटची झोप उडवणारे KKR चे RCB विरुद्ध 5 जबरदस्त रेकॉर्ड
युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे. 9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआरने उर्वरीत पर्वाची धमाकेदार सुरुवात केली आहे.
1 / 6
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा (RCB) 9 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह, आरसीबीच्या विरोधात केकेआरने मोठे विक्रम केलेत. दुबईतील अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात RCB ची संपूर्ण टीम कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 93 धावांवर ऑल आऊट झाली आणि KKR ने हे लक्ष्य सहज पार केले. आरसीबीविरुद्ध केकेआरने धमाकेदार विक्रमांची नोंद केली आहे.
2 / 6
कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 100 पेक्षा जास्त धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोलकात्याने हा पराक्रम 2008 सालीच केला होता. त्यानंतर 222 धावांचा पाठलाग करताना RCB संघ 82 धावांवर ऑल आऊट झाला आणि 140 धावांच्या मोठ्या फरकाने RCB ला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
3 / 6
सोमवारी अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL च्या सामन्यात केकेआरने आणखी एक स्फोटक विक्रम केला. आरसीबीच्या विरोधातच, केकेआरने 10 षटकांत लक्ष्य पार केलं. केकेआरने 10 षटकांत 93 धावांचे लक्ष्य गाठलं.
4 / 6
आयपीएलच्या इतिहासातील पहिले शतकही केकेआरच्या फलंदाजाने आरसीबीविरुद्धच केले होते. 2008 च्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रेंडन मॅकलमने 73 चेंडूत 158 धावांची धमाकेदार खेळी केली.
5 / 6
2019 च्या आयपीएलमध्ये, केकेआरने आरसीबीसमोर 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पार करुन दाखवून होते. बंगळुरुमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने तीन गडी बाद 205 धावा केल्या. त्याचवेळी, केकेआरने हे लक्ष्य 19.1 षटकांत 206 धावा करून बंगळुरुचा चितपट केलं होतं. विराट कोहलीने RCB साठी या सामन्यात 84 धावा आणि आंद्रे रसेलने केकेआरसाठी 13 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.
6 / 6
आरसीबीला 80 धावांमध्ये ऑल आऊट करण्याचा विक्रमही केकेआरच्या नावावर आहे. आयपीएल 2017 मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 9.4 षटकांत 49 धावांवर गुंडाळला गेला. आयपीएलच्या इतिहासातही हे पहिल्यांदा घडलं होतं.