IPL 2023 : आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकनं समोर येत स्पष्टपणे सांगितलं की…
आयपीएल जेतेपद जिंकण्याचं आरसीबीचं स्वप्न यंदाही भंगलं आहे. 16 पर्वात एकही जेतेपद आरसीबीला जिंकता आलं नाही. या हंगामात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यानंतर आता पुढे येत त्याने आपलं मत जाहीरपणे मांडलं आहे.
1 / 7
आयपीएल 2023 स्पर्धेत आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाही जेतेपदावर नाव कोरू न शकल्याने चाहते निराश झाले आहेत. साखळी फेरीत 14 पैकी 7 सामन्यात विजय आणि 7 सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने आव्हान संपुष्टात आलं.
2 / 7
यंदाच्या हंगामात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली कामगिरी केली. मात्र इतर खेळाडूंची त्यांना हवी तशी साथ लाभली नाही.
3 / 7
चार खेळाडूंच्या कामगिरीने चषक जिंकता येत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळे पराभवाचं मुख्य कारण इतर खेळाडूंची कामगिरी असल्याचं स्पष्ट आहे.
4 / 7
मॅच फिनिशर म्हणून ओळख असलेला दिनेश कार्तिकही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याचा परिणाम थेट आरसीबी संघाला भोगावा लागला.
5 / 7
आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकने भावनिक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच सर्व चाहत्यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
6 / 7
दिनेश कार्तिकने ट्विटरवर सांगितलं की, "आम्ही अपेक्षेप्रमाणे खेळू शकलो नाही. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण आम्ही स्वप्नांचा पाठलाग करतच राहू. आम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्व चाहत्यांचे आभार. तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहात.", असं दिनेश कार्तिकने सांगितलं.
7 / 7
13 डावात फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने फक्त 140 धावा केल्या. अत्यंत खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिकला पुढच्या सामन्यात संघात ठेवतील की नाही? याबाबत शंका आहे.