आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील एकूण 5 खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 15 धावांवर आऊट झाला होता. आता सूर्या चेन्नई विरुद्ध आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. त्यामुळे सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या टिळक वर्मा याने आरसीबी विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पलटणची लाज राखली होती. टिळकने केलेल्या नाबाद 84 धावांच्या जोरावर आरसीबीला सन्मानजनक विजयी टार्गेट देता आलं होतं.
चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड याने मोसमातील दोन्ही सामन्यात सलग अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराजने पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध 92 आणि त्यानंतर लखनऊ विरुद्ध 57 अशा एकूण 149 धावा केल्या आहेत. आता ऋतुराज मुंबई विरुद्ध अर्धशतकाची हॅट्रिक पूर्ण करतो की मुंबईचे गोलंदाज त्याला रोखतात, याकडे सर्वांच लक्ष असेल.
चेन्नईला ऑलराउंडर मोईन अली याने पहिल्या मॅचमध्ये 23 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलं. मोईने लखनऊ विरुद्ध 19 धावा केल्या आणि 4 विकेट्सही घेतल्या.
तुळजापूरच्या राजवर्धन हंगरगेकर याने चेन्नईकडून या मोसमात पदार्पण केलं.राजवर्धनने पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स घेत आपली छाप सोडली. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला यश आलं नाही.