राजस्थान रॉयल्स टीमचा स्टार युवा ओपनर बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यशस्वीने या खेळीसह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत शुबमन गिल याला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच यशस्वी याने एका आयपीएल मोसमात अनकॅप्ड प्लेअर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान मिळवला. यशस्वीने अनकॅप्ड प्लेअर म्हणून शॉन मार्श याचा रेकॉर्ड ब्रेक केला. अनकॅप्ड म्हणजे आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी न मिळालेला खेळाडू.
यशस्वीच्या नावावर पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी 13 सामन्यात 575 धावांची नोंद होती. यशस्वीला शॉनला मागे टाकण्यासाठी 41 धावांची गरज होती. मात्र यशस्वीने 42 वी धाव पूर्ण करताच शॉन मार्श याचा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वीने शस्वीने 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नॅथन एलिस याच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कूप मारत चौकार ठोकला. यशस्वीने यासह आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा शॉन मार्श याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
शॉन मार्श याने 2008 या आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तेव्हाच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना अनकॅप्ड प्लेअर म्हणून 619 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादव याने 2018 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनकॅप्ड खेळाडू म्हणून 512 धावा केल्या होत्या.
त्यानंतर इशान किशन याने मुंबईकडूनच 2020 साली 516 धावा करत अनकॅप्ड प्लेअर म्हणून सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.