IPL 2023 : आयपीएल इतिहासात यापूर्वी असं कधीच घडलं नाही, वाचा स्पर्धेतील टॉप 10 रेकॉर्ड
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. पण या स्पर्धेत बरेच विक्रम नोंदवले गेले आहेत. आयपीएलच्या 16 व्या पर्वात पहिल्यांदाच बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत..
1 / 10
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला गेला. या हंगामात 1124 षटकार नोंदवले गेले. 2022 मध्ये 1062 षटकार होते. (Photo : IPL/BCCI)
2 / 10
आयपीएल 2023 मध्ये चौकारांचा विक्रमही नोंदवला गेला. यावर्षी एकूण 2174 चौकार मारले असून 2022 मध्ये हा विक्रम 2018 चौकारांचा होता. (Photo : IPL/BCCI)
3 / 10
या मोसमात शतकांचा विक्रमही नोंदवला गेला. या हंगामात 12 शतके नोंदवली. 2022 मध्ये 8 शतकांची नोंद झाली होती. (Photo : IPL/BCCI)
4 / 10
आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकेही झळकली. आयपीएल 2023 मध्ये फलंदाजांनी 153 अर्धशतके झळकावली आहेत. 2022 मध्ये हे फक्त 118 वेळा घडले. (Photo : IPL/BCCI)
5 / 10
या मोसमात सर्वाधिक 200 पेक्षा जास्त स्कोअर 37 वेळा नोंदवला गेला. म्हणजेच 2022 स्पर्धेच्या दुप्पट ही संख्या आहे. 2022 मध्ये एकूण 200हून अधिक धावा फक्त 18 वेळा नोंदवल्या गेल्या. (Photo : IPL/BCCI)
6 / 10
आयपीएलच्या 16व्या मोसमात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 183 होती. आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील हा उच्चांक आहे. 2018 मध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 172 होती. (Photo : IPL/BCCI)
7 / 10
रनरेटच्या बाबतीत हा हंगाम अव्वल ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये फलंदाजांनी प्रति षटक 8.99 धावा केल्या. 2018 मध्ये हा रनरेट 8.65 धावा प्रति षटक होता. (Photo : IPL/BCCI)
8 / 10
आयपीएल 2023 मध्ये 8 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला. 2014 मध्ये हे फक्त 3 वेळा झाले. (Photo : IPL/BCCI)
9 / 10
आयपीएल हंगामात एकाच संघातील तीन गोलंदाजांनी 25 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. या लीगच्या इतिहासात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. गुजरात टायटन्सचे गोलंदाज मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि राशिद खान या यादीत सामील झाले आहेत. (Photo : IPL/BCCI)
10 / 10
आयपीएलच्या इतिहासात दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हंगामात यशस्वी जैस्वाल आणि प्रभसिमरन सिंग या यादीत सामील झाले आहेत. (Photo : IPL/BCCI)