IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप 5 संघ, कोण कोण आहे यादीत वाचा
IPL 2023 मध्ये आतापर्यंत 37 सामने झाले आहेत. आतापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. या सामन्यांमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घ्या.
1 / 6
टी-20 क्रिकेटमध्ये डॉट बॉल हे सर्वात प्रमुख अस्त्र आहे. डॉट बॉल्स फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवतो. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 37 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.
2 / 6
गुजरात टायटन्स आतापर्यंतच्या 7 सामन्यात सर्वाधिक 341 डॉट बॉलसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातने 836 चेंडूत 53 विकेट्ससह 1159 धावा दिल्या. गुजरात सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
3 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 322 डॉट बॉल टाकले आहेत. 8 सामन्यात आरसीबीने 950 चेंडूत 59 विकेट्स घेत 1497 धावा दिल्या. आरसीबी गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
4 / 6
सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यात 311 डॉट बॉलसह तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादने 808 चेंडूत 1152 धावा दिल्या आणि 43 विकेट्स घेतल्या. सध्या हैदराबादचा संघ 4 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
5 / 6
लखनऊ सुपर जायंट्स 306 डॉट बॉलसह चौथ्या स्थानावर आहे. 7 सामन्यात 837 चेंडूत 1133 धावा दिल्या आणि 46 विकेट घेतल्या. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजी 7 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
6 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. पण डॉट बॉल्सबद्दल बोलायचं तर संघाने 7 सामन्यात 300 डॉट बॉल टाकले आहे. संघाने 828 चेंडूत 1166 धावा दिल्या आणि 40 विकेट्स घेतल्या. हैदराबाद प्रमाणेच दिल्लीने फक्त दोन सामने जिंकले असून त्यांचे फक्त चार गुण आहेत.