विंडिज विरुद्ध टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव झाला. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे फोटो ट्विट केले आहेत.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असणार आहे.
आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच काही खेळाडूंचं कमबॅकही झालंय.
दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांचं कमबॅक झालंय. या दोघांना दुखापतीमुळे आयपीएल आणि इतर मालिकांना मुकावं लागलं होतं.
रिंकू सिंह याचं आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं. पंतचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. रिंकूने आयपीएल 16 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली
तर शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांची अनेक वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया बुमराहच्या नेतृत्वात कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे