दक्षिण आफ्रीकेच्या क्रिकेटमध्ये ज्यां पॉल ड्यूमिनी हे मोठं नाव आहे. तो कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने खूप नाव कमावलं आहे. ड्यूमिनी जितका जगभर प्रख्यात आणि कर्तबगार आहे तितकीच त्याची पत्नीही प्रसिद्ध आणि हुशार आहे. आपल्या सौंदर्याने नेहमी चर्चेत राहणारी सु ड्यूमिनी हिने तिच्या क्षेत्रात भरपूर नाव कमवलं आहे. या दोघांची भेट नेमकी कशी झाली, त्यांच्या पहिली भेट ते लग्न या प्रवासाविषयी सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
ड्यूमिनी आणि सु यांना पहिल्या भेटीत एकमेकांवर प्रेम जडलं होतं. सु 2008 मध्ये केप टाऊनमध्ये नोकरीच्या शोधात होती. यावेळी कामानिमित्ताने तिची ड्यूमिनीसोबत भेट झाली. पहिल्याच भेटीनंतर दोघांमध्ये इतकं नातं घट्ट झालं की ते वारंवार एकमेकांना भेटू लागले. इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.
दोघांनी 2009 मध्ये लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर 2011 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान सु हीने त्यांच्या दोघांमधील प्रेमाविषयी माहिती दिली होती. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्यानंतर काही दिवसांनी ड्यूमिनी दोन महिन्यांसाठी क्रिकेटच्या दौऱ्यावर गेला होता. ते दोन महिने आपल्यासाठी दोन वर्षांच्या बरोबर होते, असं तिने सांगितलं.
दोघांना लग्नानंतर दोन मुली आहेत. सु आपल्या मुलींसोबत अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. या दोन्ही मुलींचे नाव इसाबेला आणि लेक्सी ड्यूमिनी असं आहे.
सु हीने लग्नाआधीच आपलं नाव कमावलं होतं. ती मॉडेलिंग करायची. एक मॉडेल म्हणून ती खूप प्रसिद्ध झाली होती. आता ती एक ब्लॉगर देखील आहे. तिची स्वत:ची एक वेबसाईट देखील आहे. या वेबसाईटवर ती फिटनेस, लाईस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हल, फूड आणि मदरहूड विषयी लिहिते. ती अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.