Rohit Sharma : रोहित शर्माचा मुंबईत होणार सन्मान, ‘या’ कामगिरीबद्दल MCA करणार सत्कार!
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु आता त्याच्याकडे कसोटी संघाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित प्रथमच या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे.
1 / 4
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु आता त्याच्याकडे कसोटी संघाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित प्रथमच या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद मिळाल्याच्या आनंदात मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच रोहित शर्माचा गौरव करणार आहे.
2 / 4
रोहित शर्मा मुंबई क्रिकेट संघातून भारतीय क्रिकेट संघात पोहोचला आहे. त्याने मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले आहे. बर्याच काळानंतर एमसीएला रोहितचा सत्कार करायचा आहे. कारण मुंबईच्या खेळाडूला सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद मिळाल्याचा आनंद आहे.
3 / 4
गुरुवारी झालेल्या एमसीएच्या परिषद बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमसीएच्या एका सदस्याने पीटीआयला सांगितले की, "आज शीर्ष परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवल्याबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 / 4
रोहितशिवाय टीम इंडियामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर असलेल्या आंग्रश रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेबाज धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांनाही गौरविण्यात येणार आहे.