IND vs SA : मोहम्मद सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता मोडला अनिल कुंबलेचा रेकॉर्ड

| Updated on: Jan 03, 2024 | 4:53 PM

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त कामगिरी केली. अवघ्या 55 धावांवर दक्षिण अफ्रिकेचा संघ तंबूत पाठवला. मोहम्मद सिराजने 6 गडी बाद करत दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडवली.

1 / 6
दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला. लंचच्या आधीच संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात केलेल्या धावांचा पल्ला ओलांडत आता आघाडी घेत आहे.

2 / 6
भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी टाकली. केपटाऊनच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला. 9 षटकात 15 धावा देऊन 6 गडी बाद केले. यात 3 षटक निर्धाव टाकली.

3 / 6
दक्षिण अफ्रिकेत भारताकडून कसोटीत तिसरा सर्वात बेस्ट स्पेल टाकला. तसेच फिरकीपटू अनिल कुंबले याचा विक्रम मोडीत काढला आहे. कुंबलेने 53 धावा देऊन 6 विकेट घेतले होते.

4 / 6
मोहम्मद सिराजची कसोटी करिअरमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 15 धावा देऊन त्याने 6 गडी बाद केले. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

5 / 6
सिराजने चौथ्या षटकात एडन मार्कमला बाद केलं. त्यानंतर डीन एल्गरला क्लिन बोल्ड केलं. टोनी डीजॉर्जी, डेविड बेडिंघम, कायल वेरेन आणि मार्को यानसेन यांना तंबूचा रस्ता दाखवला.

6 / 6
टेस्ट क्रिकेटमध्ये केपटाऊनमध्ये पाच विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2011 मध्ये एस श्रीसंतने, 2011 मध्ये हरभजन सिंग, 2022 मध्ये जसप्रीत बुमराह आणि 2024 मध्ये मोहम्मद शमीने ही कामगिरी केली आहे.