Indian Women Shooters : भारताच्या ‘या’ महिला शूटर्सच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री सुद्धा फिक्या
Indian Women Shooters : ऑलिम्पिकसह अन्य आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकावर अचूक नेम साधणाऱ्या भारताच्या महिला नेमबाज सौंदर्यामध्ये अजिबात कमी नाहीत. चित्रपटातील अभिनेत्री सुद्धा त्यांच्या सौंदर्यासमोर फिक्या आहेत.
1 / 5
राजेश्वरी कुमारी ही भारताची ट्रॅप शूटर आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच तिने भारताच प्रतिनिधीत्व केलं. तिला छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. अजरबैजान येथे महिला ट्रॅप फायनलमध्ये पाचव्या स्थानावर राहून पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. ती फॅशन डिझायनर सुद्धा आहे.
2 / 5
भारताची दुसरी महिला शूटर अपूर्वी चंदेला सुद्धा स्टाइलच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाहीय. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये तिने भारताच प्रतिनिधीत्व केलय. 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये तिने भारताच प्रतिनिधीत्व केलं होतं.
3 / 5
रिदम सांगवान ही भारताची महिला नेमबाज आहे. अगदी सिंपल दिसत असली, तरी व्यक्तीमत्वामध्ये जादू आहे. नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी केल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला संधी मिळाली होती.
4 / 5
मनू भाकरला कोण ओळखत नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने इतिहास रचला. नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने दोन पदकं जिंकली.
5 / 5
हिना सिद्धू सुद्धा भारताची स्टार शूटर आहे. सौंदर्यामध्ये ती अभिनेत्रींना मागे टाकते. नेमबाजीच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये ती पहिल्या स्थानावर होती. 2012 लंडन आणि 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली होती. टोक्यो ऑलिम्पिकच तिचं तिकीट हुकलं होतं.