चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सला हरवून आयपीएल -2021 चे विजेतेपद पटकावले. चेन्नईला चौथ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. चेन्नईने विजयात सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली पण ओपनिंग जोडीने संघासाठी चमत्कार केला. या जोडीने चेन्नईला या मोसमात निराश होऊ दिले नाही. फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या जोडीने कमाल केली. या जोडीच्या बहारदार कामगिरीमुळे दोघेही आयपीएलच्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
फाफ डु प्लेसिस आणि गायकवाड यांनी या हंगामात एकत्र खेळताना एकूण 756 धावा केल्या. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये फाफ-ऋतुराज आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. ऋतुराजने या मोसमात सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप आपल्या नावे केली. त्याने 16 सामन्यांमध्ये 635 धावा केल्या. त्याचबरोबर फाफने 16 सामन्यांमध्ये 633 धावा केल्या आहेत.
एका मोसमात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेली जोडी म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सची जोडी. या जोडीने 2016 मध्ये एकत्र 939 धावा केल्या. संघ अंतिम फेरीत पोहचला पण विजेतेपद मिळवू शकला नाही.
या दोघांनंतर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची जोडी आहे. 2019 मध्ये खेळलेल्या IPL मध्ये त्यांनी मिळून 791 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या क्रमांकावर फाफ आणि गायकवाड यांची जोडी आहे, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि दिल्लीच्या शिखर धवनची सलामीची जोडी आहे. या जोडीने या मोसमात मिळून 744 धावा केल्या आहेत. संघ प्लेऑफमध्ये पोहोचला पण पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याकडून त्यांचा पराभव झाला.
पाचव्या क्रमांकावर वॉर्नर आणि धवनची जोडी आहे. या जोडीने 2016 मध्ये 731 धावा केल्या होत्या. धवन तेव्हा सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असे. या मोसमात हैदराबादने जेतेपद पटकावले होते.