टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. हा सामना 10 सप्टेंबरला असणार आहे. या महामुकाबल्याआधी टीम इंडियासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. टीम इंडियाला विजयासाठी अनेक सुधारणा कराव्या लागणार आहेत.
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाला साखळी फेरीतील सामन्यात अपेक्षित बॅटिंग करता आली नाही. टॉप ऑर्डरने सपशेल निराशा केली. टीम इंडियाला इथे सुधार करावा लागेल. तर ओपनिंग म्हणून रोहित शर्मा आणि शुबमनवर मोठी जबाबदारी असेल. विराटलाही विशेष असं काही करता आलं नव्हतं. त्यामुळे विराटकडून पाकिस्तान विरुद्ध पुढील सामन्यात मोठी खेळीची अपेक्षा असणार आहे.
एकटा कोहलीच नाही, तर श्रेयस अय्यर यालाही काही विशेष करता आलं नाही. टीम इंडियाला पाकिस्तानच्या वेगवान गोलंदांजाचा मारा उलटवून लागणार आहे. कारण पहिल्या सामन्यात शाहीन अफ्रिदी आणि नसीम शाह दोघांनी टीम इंडियाची बॉलिंगने कंबर मोडली होती.
टीम इंडियाची फिल्डिंगही पडती बाजू आहे, कारण नेपाळ विरुद्धचा सामना. टीम इंडियाच्या विराट कोहली याने कव्हर पॉईंटवर, श्रेयस अय्यर याने स्लीप आणि ईशान किशनने विकेटकीपिंग दरम्यान नेपाळ विरुद्ध पहिल्या 5 ओव्हरमध्ये प्रत्येकी 1 अशा 3 कॅच सोडल्या.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. त्यानंतर टीम इंडियाने पुढील सामन्यात नेपाळवर 10 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडियाचा सुपर 4 मधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध रविवार 10 सप्टेंबरला होणार आहे.