टी20 मालिकेत पाकिस्तानच्या हसन नवाजने रचला नकोसा विक्रम, मिळाला डकमॅनचा टॅग

हसन नवाजने टी20 मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा पाकिस्तानी नकोसा विक्रम रचला आहे. तिसऱ्या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 105 धावा वगळल्या तर, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील उर्वरित 4 सामन्यात फक्त 1 धाव केली आहे.

1 / 5
हसन नवाज न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या पाच डावात तीन वेळा शून्यावर बाद होऊन नकोसा विक्रम रचला आहे.

2 / 5
हसन नवाज टी20 मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा पाकिस्तानी सलामीवीर ठरला आहे. त्याने पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही केला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हसन नवाजने 44 चेंडूत शतक पूर्ण करून ही कामगिरी केली.

3 / 5
टी20 मालिकेत तीन वेळा शून्यावर बाद होणारा आयसीसी सदस्य देशाचा पहिला फलंदाज होण्याचा नकोसा विश्वविक्रमही नवाजच्या नावावर आहे.नवाजने 5 डावात 3 शून्य आणि एका शतकासह १०६ धावा केल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तीन वेळा शून्यावर बाद होऊनही, हा फलंदाज मालिकेत पाकिस्तानसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला.

4 / 5
हसन नवाजने या मालिकेतून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.टी20 क्रिकेटमध्ये आधी हा विक्रम शाहजैब हसन, मोहम्मद हाफीज आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर होता. प्रत्येकी 2 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

5 / 5
शाहजैब हसन, मोहम्मद हाफीज आणि मोहम्मद रिझवान  या तिघांनी हसन नवाजप्रमाणे 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली नाही. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत शाहजैब हसन दोनदा शून्यावर, मोहम्मद हाफीज 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत आणि मोहम्मद रिझवान 4 सामन्यांच्या टी20 मालिकेत  दोनदा शून्यावर बाद आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)