WTC Final साठी ‘हा’ खेळाडू भलताच उत्सुक, नवी जर्सी घालून केलं भन्नाट फोटोशूट!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंसह दोन्ही देश या सामन्यासाठी उत्सुक आहेत.
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू उत्सुक आहेत. पण भारताच्या रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) इतरांपेक्षा खूपच उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.
2 / 5
सामन्यापूर्वी जाडेजाने नव्या जर्सीत एक भन्नाट फोटोशूट केलं आहे. या सर्व फोटोजमध्ये तो वेगवेगळ्या पोजमध्ये दिसतो आहे.
3 / 5
रवींद्र जाडेजा भारतीय संघातील सर्वांत महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही महत्त्वाचे योगदान करतो.
4 / 5
रवींद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला अंतिम 15 मध्ये ही स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी जाहीर केलेल्या अंतिम यादीत जाडेजाचं नाव आहे.
5 / 5
फिरकीपटूंचा रेकॉर्ड इंग्लंडमध्ये तितका खास नसतानाही जाडेजाला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो या संधीचे सोने करतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.