अष्टपैलू रवींद्र जडेजा नव्या विक्रमाच्या वेशीवर, 2 गडी बाद करताच रचणार इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेत अनेक विक्रम रचले आणि मोडले जाणार आहेत. त्यामुळे ही कसोटी मालिका खास असणार आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा या मालिकेत खास विक्रमाच्या वेशीवर आहे. दोन गडी बाद करताच मानाच्या पंगतीत स्थान मिळणार आहे.
1 / 6
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रवींद्र जडेजासाठी ही मालिका खास असणार आहे.
2 / 6
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजाने फक्त 2 विकेट घेतल्यास मानाच्या पंगतीत स्थान मिळणार आहे. दिग्गद 6 भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याचा सहभाग होईल.
3 / 6
जडेजाने पहिल्या कसोटीत दोन विकेट घेतल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा रवींद्र जडेजा हा सातवा गोलंदाज ठरणार आहे.
4 / 6
अनिल कुंबळे, कपिल देव, झहीर खान, हरभजन सिंग, आर अश्विन आणि जवागल श्रीनाथ हे भारतीय गोलंदाज या यादीत आहेत. या गोलंदाजांनी 550 विकेट्सचा पल्ला गाठला आहे.
5 / 6
रवींद्र जडेजाने भारताकडून आतापर्यंत 68 कसोटी, 197 वनडे आणि 66 टी20 सामने खेळले आहेत. जडेजाने आतापर्यंत कसोटीत 275, एकदिवसीय सामन्यात 220 आणि टी20 मध्ये 53 बळी घेतले आहेत.
6 / 6
जडेजाने इंग्लंडविरुद्ध 16 कसोटी सामने खेळले असून 51 बळी घेतले. टीम इंडियाने आतापर्यंत या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली असून या दोन्ही सामन्यांसाठी रवींद्र जडेजा संघाचा भाग आहे.