IPL 2025 : गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, काय ते वाचा

| Updated on: Apr 03, 2025 | 2:52 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 14व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 गडी राखून पराभव केला. आरसीबीने गुजरातसमोर विजयासाठी 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य गुजरात टायटन्सने फक्त 17.5 षटकात पूर्ण केलं.

1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 18व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या पराभवानंतर एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. होम ग्राउंडवर पराभव झाल्यानंतर नको त्या पंगतीत बसला आहे. बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 14 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते.

2 / 5
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20  षटकांत 8 गडी गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने 17.5 षटकांत 170  धावा केल्या आणि 8 विकेट्सने विजय मिळवला.

3 / 5
पराभव होताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याचा हा नकोसा विक्रम आहे. आरसीबी आयपीएलच्या इतिहासात होम ग्राउंडवर सर्वाधिक पराभव पत्करणारा संघ बनला आहे.

4 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर 92 सामने खेळले आहेत. या काळात, आरसीबीने तब्बल 44 सामने गमावले आहेत. यासह होम ग्राउंडवर सर्वाधिक सामने गमावण्याच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

5 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 82 सामने खेळले आहेत. यात 44 सामने गमावले आहेत. तर आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या 92 पैकी 44 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)