भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. भारतासह पाकिस्तानमध्येही विराटचे फॅन्स असून त्याची एक पाकिस्तानी चाहती बरीच प्रसिद्ध आहे. रिजला रेहान (Rizla Rehan) असं तिच नाव असून तिने एका मुलाखतीत 'विराटला मला द्या,' अशी अजब मागणी केली होती. (Rizla Rehan Virat Kohli Pakistani Fan Asks For Virat kohli in Live Interview)
रिजला सर्वात आधी 2018 च्या आशिया चषकात समोर आली होती. पाकिस्तानच्या संघाला सपोर्ट करणाऱ्या रिजलाचे सुंदर फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते.
त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात भारतातील आज तक चॅनेलला तिने दिलेल्या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याला तिने एक अजब उत्तर देत 'विराटला मला द्या' अशी मागणी केली होती.
या मुलाखतीत रिजलाला प्रश्न विचारला कि, ''अशी कोणती गोष्ट आहे जी तू भारतातून पाकिस्तानला घेऊन जाऊ इच्छित आहेस?'' त्यावर तिने ''मला प्लीज विराटला द्या'' अशी मजेशीर मागणी केली होती.
रिजला ही क्रिकेट फॅन असण्यासोबतच एक समाजसेवक देखील आहे. ती गरजू मुलांच्या शिक्षणासाठी झटत असून इस्लामाबाद, दुबईसारख्या शहरात समाजसेवा करते. रिजला एका Deaf Reach या संस्थेची गुडविल अॅम्बेसिडर देखील आहे.