IPL 2024 मध्ये काल 29 वा सामना झाला. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला. यात CSK ने MI वर 20 धावांनी विजय मिळवला.
पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला जबाबदार धरल जात आहे. पण या मॅचमध्ये ओपनर रोहित शर्माने सुद्धा 3 मोठ्या चूका केल्या.
रोहित शर्मा सेट होता. पण, तरीही तो डेथ ओव्हर्समध्ये वेगाने फलंदाजी करु शकला नाही. 15 ते 19 ओव्हर दरम्यान रोहित शर्माने 12 चेंडूत फक्त 17 धावा केल्या.
रोहित शर्माने 15 ते 19 व्या ओव्हर दरम्यान फक्त 2 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. त्याने एक सिक्स आणि एक फोर मारला.
रोहित शर्माची तिसरी मोठी चूक म्हणजे त्याच्याकडे प्लान बी नव्हता. पथिरानाच्या यॉर्करवर त्याने कुठलाही वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न केला नाही.